Category Archives: Shikshan Manthan

‘स्वधा’ – एक मुक्त निसर्गशाळा

लेंड-अ-हँड इंडिया द्वारे सुरु करण्यात आलेल्या शिक्षण मंथन कार्यक्रमाची आठवी बैठक दिनांक २८ जानेवारी २०१६ रोजी आयोजित करण्यात आली होती. याकरिता प्रमुख वक्ते म्हणून पुण्यातील ‘स्वधा – अ स्टायनर्स स्कूल’ ह्या शाळेच्या संस्थापिका आणि मुख्याध्यापिका सौ. शेफाली कोस्टा ह्यांना आमंत्रित करण्यात आले होते. ऑस्ट्रीयन विचारवंत आणि तत्त्वज्ञ डॉ. रुडॉल्फ स्टायनर यांच्या तत्त्वज्ञानावर आधारित शाळा त्यांनी २०१२ मध्ये पुण्यात सुरु केली.P1120594.JPG

सौ. शेफाली कोस्टा यांनी संस्कृत वेदांत ह्या विषयात पुणे विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. पदव्युत्तर शिक्षण घेत असतानाच प्रत्येक वेळी भारतीय शिक्षणाचा पौराणिक वारशाचा खजाना त्यांना मिळत गेला. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्या कॉर्पोरेट क्षेत्रात काम करू लागल्या. परंतु पदव्युत्तर शिक्षण घेत असताना मिळालेला व समजलेला भारतीय शिक्षणाचा पौराणिक वारसा त्यांना शांत बसू देत नव्हता. Continue reading ‘स्वधा’ – एक मुक्त निसर्गशाळा

ज्ञानरचनावाद व कृती आधारीत शिक्षण – केंजळ तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील प्रयोग

IMG_1177.JPGलेंड-अ-हँड इंडिया द्वारे सुरु करण्यात आलेल्या शिक्षण मंथन कार्यक्रमाची सातवी बैठक दिनांक २३ डिसेंबर २०१५ रोजी आयोजित करण्यात आली होती. याकरिता प्रमुख वक्ते म्हणून भोर जिल्ह्यातील केंजळ या गावातील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्री. जे. के. पाटील यांना आमंत्रित करण्यात आले होते. जिल्हा परिषदेतील या शाळेमध्ये प्रायोगिक तत्वावर ज्ञानरचनावाद आणि कृती आधारित शैक्षणिक उपक्रमांवर भर देऊन सदर उपक्रम राबवण्यासाठी पाटील सरांनी प्रयत्न केले आहेत. सदर शाळेतील अनुभवावरून पुढे भोर तालुक्यातील इतर ३० शाळांमध्ये हा पॅटर्न यशस्वीपणे राबविण्यात आला व आता हा कृती आधारित शिक्षणाचा प्रयोग संपूर्ण राज्यात गिरवण्यास सुरुवात झाली आहे. सदर उपक्रमाकरता निवृत्त शिक्षण अधिकारी श्री. प्रकाश परब यांचे मार्गदर्शन लाभले आहे. Continue reading ज्ञानरचनावाद व कृती आधारीत शिक्षण – केंजळ तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील प्रयोग

प्रयोगशील कृतीवर काम करणारे Quality Education Support Trust (QUEST)

लेंड-अ-हँड इंडिया द्वारे सुरु करण्यात आलेल्या शिक्षण मंथन कार्यक्रमाची सहावी बैठक दिनांक २६ नोव्हेंबर २०१५

100_1735.JPG
Mr Nimkar of QUEST

रोजी आयोजित करण्यात आली होती. याकरिता प्रमुख वक्ते म्हणून Quality Education Support Trust (QUEST) या संस्थेचे संचालक ‘श्री. निलेश निमकर’ यांना आमंत्रित करण्यात आले होते.

बैठकीचा थोडक्यात वृत्तांत खालीलप्रमाणे –

 

गेली १५ वर्षाहून अधिक काळ श्री. निमकर सर शिक्षण क्षेत्रात काम करीत आहेत. सर आणि त्यांचे मित्र – मैत्रिणींनी एकत्र येऊन नेहमी शिक्षण व त्याची गुणवत्ता या विषयावर चर्चा करत असत.  मुलांना शिक्षण तर मिळतय पण ते ज्या गुणवत्तेच हवय त्या गुणवत्तेच मिळत नाहीये हे लक्षात आल्यावर ही गुणवत्ता कशी वाढवता येईल ह्याचा विचार सुरु झाला. Continue reading प्रयोगशील कृतीवर काम करणारे Quality Education Support Trust (QUEST)

संतुलन संस्थेची पाषाणशाळा

लेंड-अ-हँड इंडिया द्वारे सुरु करण्यात आलेल्या शिक्षण मंथन कार्यक्रमाची पाचवी बैठक दिनांक २९ ऑक्टोबर २०१५ रोजी आयोजित करण्यात आली होती. प्रमुख पाहुणे म्हणून संतुलन संस्थेचे संस्थापक मा. श्री. बस्तू रेगे यांना आमंत्रित करण्यात आले होते.

Shikshan Manthan_29-10-2015
Mr Rege talks about Santulan

श्री. बस्तू रेगे यांचे प्राथमिक शिक्षण महाराष्ट्रात, महाविद्यालयीन शिक्षण गोव्यात तर पदव्युत्तर शिक्षण कर्नाटक येथे झाले. पदव्युत्तर शिक्षणानंतर पुण्यात येऊन त्यांनी कायद्याचे शिक्षण घेतले. पुण्यामध्ये येण्याची प्रेरणा त्यांना आण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलन व मेघा पाटकर यांच्या नर्मदा बचाव आंदोलनामुळे मिळाली असे ते सांगतात. Continue reading संतुलन संस्थेची पाषाणशाळा

पुनरुत्थान समरसता गुरुकुलम” : गुरुकुलम पद्धतीवर आधारित शिक्षण – डॉ. गिरीश प्रभुणे

लेंड-अ-हँड इंडिया द्वारे सुरु करण्यात आलेल्या शिक्षण मंथन कार्यक्रमाची चौथी बैठक दिनांक २४ सप्टेंबर २०१५ रोजी आयोजित करण्यात आली होती. प्रमुख पाहुणे म्हणून मा. डॉ. श्री. गिरीश प्रभुणे यांना आमंत्रित करण्यात आले होते.

डॉ. गिरीश प्रभुणे
डॉ. गिरीश प्रभुणे

लहानपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य करणारे व कार्यकर्ते असणारे श्री. प्रभुणे सर संघाचाच एक भाग असलेल्या ग्रामायण या संस्थेमध्ये १५ वर्ष कार्यरत होते. ह्या कार्यादरम्यानच त्यांचा फासे-पारधी, कोल्हाटी, डोंबारी, लमाण, नंदीवाले, मरीआईवाले, गोंधळी, वासुदेव इ. समाजाच्या लोकांशी संपर्क आला. परंपरागत अंगभूत कला अवगत असलेले हे लोक शिक्षणापासून मात्र वंचित आहेत असे लक्षात आल्यावर त्यांच्या या कलागुणांसोबतच शिक्षण देखील द्यायची गरज लक्षात आली. त्यांच्यासाठी विविध प्रकारचे शैक्षणिक प्रकल्प राबवले गेले. काही वर्षांनी जेव्हा ह्या प्रकल्पांचा आढावा घेतला गेला तेव्हा लक्षात आलं की मुलांना शिक्षण देऊनही मुलं बेरोजगार आहेत. शिक्षणामुळे त्यांच्यातले नैसर्गिक ज्ञान जसे की, औषधी वनस्पतीची नाव व उपयोग इ. ज्ञान मात्र ते विसरलेत. Continue reading पुनरुत्थान समरसता गुरुकुलम” : गुरुकुलम पद्धतीवर आधारित शिक्षण – डॉ. गिरीश प्रभुणे

“रचनावाद” आधारित प्राथमिक शिक्षणाचे प्रयोग – प्रतिभा भराडे

शिक्षण मंथन”ची तिसरी बैठक गुरुवार, दिनांक २७ ऑगस्ट २०१५ रोजी आयोजित करण्यात आली होती.

ऑगस्ट महिन्याचे “शिक्षण मंथन”, श्रीमती. प्रतिभा भराडे यांच्याद्वारे झाले.

Guest Speaker Pratibha Bharade alongwith Sandeep of LAHI
Guest Speaker Pratibha Bharade alongwith Sandeep of LAHI

शिक्षण क्षेत्रात विविध प्रकारे कार्यरत असणार्‍या अनेक शाळा, संस्थांचे प्रतिनिधी सदर बैठकीला उपस्थित होते. महत्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा, प्रश्नोत्तरे, अनुभवांचे आदान-प्रदान झाले. बैठकीत झालेल्या एकूण चर्चेचा गोषवारा थोडक्यात पुढे देत आहे :-

प्रतिभा भराडे सातारा जिल्ह्यातल्या कुमठे विभागाच्या (-सज्जनगडाच्या पायथ्याचा परिसर) शिक्षण विस्तार अधिकारी आहेत. आधी सहा वर्षे शिक्षक म्हणून काम केल्यावर भराडे यांनी प्रशासकीय कार्यभार स्विकारला होता.

सगळी मुलं शाळेत आली पाहिजेत, ती शाळेत टिकली पाहिजेत, त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळालं पाहिजे यासाठी शिक्षण विस्तार अधिकारी प्रतिभा भराडे झपाटल्यागत काम करत आहेत. सरकारी चौकटीत राहून चौकटीबाहेरचं काम कसं करता येईल, हे दाखवताना बीटमधल्या ४० पैकी ४० शाळांमधल्या मुलांच्या मनात त्यांनी घर केलंय.

शैला दाभोळकर यांच्या सहाय्याने त्यांनी त्यांनी तब्बल ३६ शाळांमध्ये सेंद्रिय परसबागेची संकल्पना राबवून कुपोषणावर मात केली.

https://www.youtube.com/watch?v=LEE-XhWSlAk Continue reading “रचनावाद” आधारित प्राथमिक शिक्षणाचे प्रयोग – प्रतिभा भराडे

३६५ दिवसांची शाळा

Guest Speaker sharing his experiences with the participants
Mr Dattatraya Sakat shares his innovations with the audience

शिक्षण मंथन”ची दुसरी बैठक गुरुवार, दिनांक २३ जुलै २०१५ रोजी आयोजित करण्यात आली होती.

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील कर्डेलवाडी येथील जिल्हापरिषदेची शाळा ३६५ दिवस चालू असते!!!!! आणि हो ही निवासी अथवा आश्रम शाळा नाही. तरीदेखील तेथील विद्यार्थी-विद्यार्थिनी वर्षभर शाळेत येतात. सदर शाळा ISO प्रमाणित आहे!! मुख्याध्यापक श्री. दत्तात्रय रा. सकट आणि त्यांच्या शिक्षिका पत्नी श्रीमती बेबीनंदा सकट, हे समर्पित जोडपे ही शाळा चालवितात.

जुलै महिन्याचे “शिक्षण मंथन”, श्री. दत्तात्रय रा. सकट यांच्याद्वारे झाले.

शिक्षण क्षेत्रात विविध प्रकारे कार्यरत असणार्‍या अनेक संस्थांचे प्रतिनिधी सदर बैठकीला उपस्थित होते. महत्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा, प्रश्नोत्तरे, अनुभवांचे आदान-प्रदान झाले. बैठकीत झालेल्या एकूण चर्चेचा गोषवारा थोडक्यात पुढे देत आहे :-

शिक्षणाची कोणतीही पार्श्वभूमी नसलेल्या कुटुंबात दत्तात्रय रा. सकट यांचा जन्म झाला. आत्यंतिक गरिबीत बालपण गेले. पण महात्मा फुले, डॉ. आंबेडकर यांच्या प्रभावाने शिक्षण पूर्ण केले. पुढे शिक्षकी पेशा स्विकारला. पत्नीदेखील शिक्षिकाच. Continue reading ३६५ दिवसांची शाळा