‘बालवीर शाळेची कौशल्यवीर मूलं’

By Ganesh Dalvi,LAHI:

 

’खरं, तर मी या चार पाच विद्यार्थ्यांना शाळेतून काढुन टाकायचं ठरवलं होत आणि मी त्यांच्याशी तसं बोलले देखील होते. काही काळाने मात्र हेच विद्यार्थी शाळेमध्ये सुरु असलेल्या ‘मल्टी स्किल फौंडेशन कोर्स’ या नावाच्या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या सत्रांमध्ये मात्र समरसून सहभागी होताना दिसत होते हा फरक मला जाणवला’’

हुतात्मा बालवीर शिरीषकुमार माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती संध्या जाधव या ‘मल्टी स्किल फौंडेशन कोर्स’ च्या विद्यार्थ्यांबाबत बोलताना सांगत होत्या. श्रीमती जाधव या शाळेमध्ये व्यवसाय अभ्यासक्रम सुरु झाल्यापासून मुख्याध्यापक पदावर आहेत. त्यांच्या मते मल्टी स्किल फौंडेशन कोर्स मुळे विद्यार्थ्यांची पटसंख्या तर वाढलीच परंतु त्यांच्यामधील बरेच छोटे छोटे बदल आम्हाला शाळा स्तरावर दिसून येत आहेत.

हुतात्मा बालवीर शिरीषकुमार माध्यमिक विद्यालय ही पुणे महानगरपालिकेची शाळा असून या शाळेमध्ये सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या परिस्थितीतून बहुसंख्य विद्यार्थी प्रवेश घेतात. हे प्रवेश सुद्धा बऱ्याचदा आर्थिक विवंचना आणि एकूणच शिक्षणाबद्दलची अनास्था यातुन घेतलेले दिसतात. केवळ दहावी/बारावी पर्यंतच शिक्षण पूर्ण करायचं म्हणून विद्यार्थी प्रवेश घेतात आणि कसे बसे रखडत पूर्ण करतातना दिसतात. शाळेमध्ये रोज यायला सुद्धा या मुलांना दुर्दैवाने काहीच सकारात्मक आणि अर्थपूर्ण दिसत नाही. याउलट ते भीतीपोटी शाळेत येण्याचीच शक्यता जास्त दिसते. असे सर्वसाधारण चित्र असताना देखील व्यावसाय अभ्यासक्रमामुळे शाळेचे रूप बदलण्यात खूप मदत होत आहे असे शिक्षकवृंद सांगतात. कौशल्य शिक्षण घेणारे हे विद्यार्थी विद्यार्थी शाळेमध्ये विविध उपक्रमात स्वत:हून सहभागी होताना दिसतात.

HM 2
मुख्याध्यापिका श्रीमती संध्या जाधव

असाच एक माजी विद्यार्थी ‘विजय’ इतर विषयांमध्ये जेमतेम मार्कांवर पास होणारा मात्र कौशल्य शिक्षण अभ्यासक्रमात त्याला आवड होती. दरवर्षी होणाऱ्या विज्ञान प्रदर्शनात विजय आवर्जून भाग घ्यायचा आणि मल्टी स्किल फौंडेशन कोर्स मध्ये शिकलेले कौशल्य वापरून सतत नवनवीन प्रकल्प प्रदर्शनात सादर करायचा. सध्या विजय घरात किंवा बाल्कनीमध्ये ठेवायची डेकोरेशन प्लांट तयार करून बाजारात त्याची विक्री करत आहे. हे केवळ कौशल्य शिक्षणामुळे शक्य झाल्याचे विजय सांगतो.

शाळेतील शिक्षकही कौशल्य शिक्षणाच्या माध्यमातून इतर विषयांची आवड विद्यार्थ्यांमध्ये रुजवताना दिसतात. विद्यार्थ्यांमधील हा बदल शिक्षक आणि पालक यांना सुखावणारा आहे. शाळेतील इतर वर्गातील मुलांवरही याचा सकारात्मक परिणाम होताना दिसतो आहे. यावर्षीच्या दहावीच्या बॅचने महानगरपालिका आयोजित ‘कौशल्योत्सव २०१८’ या प्रदर्शन आणि स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला. शाळेचा आणि पालकांचा या मुलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. याच बॅच मधील काही विद्यार्थ्यांनी यावर्षी दहावीची परीक्षा दिल्यानंतर निरोप समारंभात शाळेला स्वत:च्या हाताने आकर्षक असे लाकडी घड्याळ बनवून दिले. हे घड्याळ अतिशय सुबक आणि सुंदर असल्याने या विद्यार्थ्यांना शाळेबाहेर जवळपास दहा नवीन घड्याळांची ऑर्डर मिळाली आहे.

Hutatma Balveer Shirishkumar vidyalay, Shivajinagar_1 (1)
‘कौशाल्योत्सव २०१८’ प्रथम क्रमांक, सोबत वर्ग शिक्षिका आणि निदेशक

हे घड्याळ तयार करणाऱ्या गटातील करण कसबे, रोशन आडे, गणेश मल्लूर या विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला असून भविष्यात कौशल्य शिक्षण पूर्ण करून स्वत:चा व्यवसाय उभारण्याचा त्यांचा मानस असल्याचे हे विद्यार्थी सांगत आहेत. यातील रोशन आडे या विद्यार्थ्याचे वडील मोलमजूरी करतात तर आई घरा जवळ इतरांकडे घरकाम करते. कामाच्या ठिकाणी सहज बोलताना एकदा आईने रोशन ने तयार केलेल्या घड्याळांबाबत सांगितले. ज्या ठिकाणी रोशनची आई कामं करत होती त्या लोकांनी देखील त्याने बनवलेले घड्याळ पाहून दोन घड्याळांची ऑर्डर रोशनला दिली.

IMG_0140_1
विद्यार्थी रोशन आडे, सोबत मुख्याध्यापिका आणि वर्गशिक्षिका

आपणही स्वत:च्या हिमतीवर आणि आपल्या प्राप्त कौशल्यांच्या जोरावर नवीन काहीतरी करू शकू हा विश्वास मल्टी स्किल फौंडेशन कोर्स ने या विद्यार्थ्यांना दिला आहे. यांच्यासारखेच अनेक विद्यार्थी आज मल्टी स्किल फौंडेशन कोर्स हा अभ्यासक्रम आत्मसात करत आहेत. आणि आपले भविष्य आपणच सुरक्षित करू शकतो यावर विश्वास ठेवून लाखो विद्यार्थी या नव्या प्रवाहात सामिल होऊ पाहत आहेत.

The writer Ganesh Dalvi, works as a communication officer with Lend A Hand India. He likes to travel and collect the unnoticed stories from the field

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

%d bloggers like this: