व्यक्तिमत्व घडवणारी शाळा ‘’घर’’

By Ganesh Dalvi,LAHI:

08cde455-ca82-4f8d-bd65-704246d196c1
 JRF विद्यार्थ्यांची क्षेत्रभेट

 ‘‘माझ्या घरातील वयस्कर व्यक्तींसोबत बोलताना मला जाणवत होत की आपण बऱ्याचदा घरातील लोकांना सरळ सरळ गृहीतचं धरतो. म्हणजे रोज आईनेच जेवण बनवायचं असतं, घरातील काम वडील किंवा मोठा भाऊ अथवा बहीण यांनीच करायचे असतात इत्यादि. घरातील वयस्कर लोकांकडे दुर्लक्ष करणे, त्यांना काही समजत नाही असे असंख्य पूर्वग्रह माझ्याही मनात होते परंतु जेव्हा जेआरएफ(JRF) उपक्रमांतर्गत मी माझ्या आजोबांची मुलाखत घेतली तेव्हा मात्र मला अनपेक्षित धक्का बसला. मला जाणवलं की मी किती सहजपणे घरातील माणसांना गृहीत धरते आणि त्यातुन त्यांच्याशी वागते.’’

रविना आपला मुलाखत घेण्याच्या अनुभवावर बोलत होती. तर…

‘‘मी आजपर्यंत कधीच मुलाखत घेतलेली नाही, पहिल्यांदा मी माझ्या मोठ्या बहिणीची मुलाखत घेतली. सुरुवातीला मी थोडा घाबरलो होतो परंतु नंतर माझ्या आणि ताईच्या बोलण्यात सहजता आली आणि मी चांगल्या पद्धतीने मुलाखत घेऊ शकलो. मला जाणवलं की ताई खुप आत्मविश्वासाने प्रश्नांची उत्तरे देते आहे. मला या मुलाखती मधुन माझ्या ताईबद्दल अनेक नवीन गोष्टींची माहिती झाली याशिवाय प्रश्न कसे विचारावे, कशा पद्धतीने विचारावे हे समजले. माझ्या प्रश्नांमुळे तिचे मन दुखावले जाणार नाही याची मी दक्षता घेतली. ताई चा आजवरचा सगळा संघर्ष मला यानिमित्ताने जाणून घेता आला.’’

रवींद्र मुलाखत घेतल्यानंतरचा संपूर्ण मुलाखतीचा अनुभव सांगत होता.

 पहिला अनुभव सांगणारी रविना वाणिज्य शाखेतून पदवीचे शिक्षण घेत आहे तर रवींद्र देखील पदवीचे शिक्षण घेतो आहे. १० वी किंवा १२ वी नंतर पुढे काय करावे या चक्रात अडकलेल्या विद्यार्थ्यांपैकी हे दोघेजण आहेत. आर्थिक परिस्थितीमुळे घरातून मदतीची अपेक्षा करणे योग्य वाटत नाही, पुर्णवेळ अथवा अर्धवेळ नोकरी करण्यासाठी तशी उपलब्धता किंवा आवश्यक कौशल्ये नाहीत अशी परिस्थिती बऱ्याच ग्रामीण व शहरी विद्यार्थ्यांची आहे. अशा विद्यार्थ्यांसाठी सुरु केलेल्या ‘‘ज्युनिअर फेलोशिप’’(JRF) या लेंड अ हँड इंडियाच्या उपक्रमाच्या ४थ्या बॅचमध्ये १२ विद्यार्थी सहभागी आहेत. समाजिक व आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या विद्यार्थ्यांना मदतीचा आणि आत्मविश्वासाचा हात जेआरएफ(JRF) उपक्रमाद्वारे मिळतो आहे. ज्युनिअर फेलोशिप हा अनुभवावंर आधारित शिक्षण देणारा हा उपक्रम असून सहा महिन्यांचे प्रशिक्षण आणि तीन महिन्यांची इंटर्नशिप असे या उपक्रमाचे स्वरूप आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना स्वत:ची ओळख होणे, विविध व्यावसायिक कौशल्ये जसे संगणक वापर, गरजेनुसार तंत्रज्ञान वापराचे मार्गदर्शन, उद्यमशीलता, क्षेत्र भेटी व त्यांचा अभ्यास, तज्ञांचे मार्गदर्शन, संवाद कौशल्ये, इंग्रजी संभाषण इत्यादि बाहेरील जगतात काम करण्यासाठी आवश्यक कौशल्ये शिकविली जातात. सहा महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर या फेलोजने पुढील तीन महिने आवश्यकतेनुसार प्रत्यक्ष काम करणे अपेक्षित असते.

सहा महिन्यांच्या प्रशिक्षण काळात विद्यार्थ्यांना विविध असाईनमेंट्स देण्यात येतात. याचाच एक भाग म्हणुन उपक्रमातील सर्व सहभागी विद्यार्थ्यांना आपल्या घरातील एका व्यक्तीची मुलाखत घेण्याची असाईनमेंट देण्यात आली होती. सर्व विद्यार्थ्यानी अतिशय काळजीपूर्वक आणि तपशिलांमध्ये जाऊन घरातील व्यक्तींच्या मुलाखती घेतल्या. सर्वसाधारणपणे आपल्या घरातील व्यक्ती या आपल्यासाठी संपुर्णपणे ओळखीच्या असतात असचं आपल्याला वाटत असत. रोज आपण ज्या व्यक्तींसोबत राहतो ती माणस देखील इतरांनसारखीच असतात मात्र आपलं त्याकडे दुर्लक्ष होत. घरातील व्यक्तींकडून आपल्याला खूप काही शिकायला आणि अनुभवायला मिळत असते. विद्यार्थ्यांना या असाईनमेंट्स द्वारे घरातील व्यक्तींबद्दलची अधिक माहिती मिळालीच शिवाय घरातील व्यक्तींपासून सुद्धा खूप काही शिकण्यासारखे आहे हे समजावे हा या असाईनमेंट चा उद्देश होता.

                             आपल्या स्वत:च्या क्षमता जसे मुलाखतीसाठी घरातील व्यक्ती ठरवणे त्यासाठी प्रश्न तयार करणे, ते लिहून काढणे, तपासून घेणे यातुन त्यांच्या विचारांमध्ये छोट्या स्तरावरील बदल दिसुन येतात. मुलाखतीसाठी जागेची निवड, मुलाखत देणाऱ्याची योग्य वेळ आणि जागा याचे तपशील ठरवणे याशिवाय प्रश्न विचारण्याच्या पद्धती त्यांचे क्रम लावणे. आणि यातुन समोरच्या व्यक्तीला बोलत करणे असे बहुविध कौशल्ये विद्यार्थ्यांनी यात वापरली. वरकरणी पाहता छोटी वाटणाऱ्या या असाईनमेंट्स द्वारे विद्यार्थ्यांना एक नवा दृष्टीकोन मिळाल्याची भावना सर्वच विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. काही विद्यार्थ्यांनी यातुन आत्मविश्वासात वाढ झाली असे सांगितले तर काहींना यातुन सुसंगत विचार कसा करावा एखाद्या व्यक्तीमत्वाबद्दल कशी माहिती मिळवावी तसेच काहींसाठी संवाद कौशल्यांची उजळणी झाली. शिकण्याची खरी प्रक्रिया घरातूनच सुरु होते अशा भावना विद्यार्थी व्यक्त करताना दिसत आहे. जे आर एफ(JRF) उपक्रम सुरु करण्यामागचा उद्देशच हा ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना नोकरी/व्यवसाय करण्यासाठी आवश्यक असणारे आणि व्यक्तिमत्त्व विकासात आवश्यक असणारी जीवन कौशल्य रुजविणे हा आहे.

IMG_9553
JRF विद्यार्थ्यांसाठी तज्ञांचे मार्गदर्शन

या सर्व विद्यार्थ्यांना या मुलाखतींमधून आपल्या घरातील मोठ्या व्यक्तींबाबत आणि एकूणच कुटुंबाबाबत खूप गोष्टी नव्याने माहिती झाल्या. मुलाखतकाराच्या आयुष्यातील संघर्ष, अडचणींचा काळ यासह बालपणीच्या आठवणी, अविस्मरणीय क्षण, कठीण परिस्थितीतून काढलेले मार्ग, मुलांच्या शिक्षणासाठीची धडपड, मोठ्या कुटुंबांची होरपळ, कामानिमित्ताचे स्थलांतर अशा विविध गोष्टींबाबत अनभिज्ञ असलेल्या या मुलांना जगण्याकडे पाहण्याची एक सकारात्मक दिशा नक्कीच मिळाली असणार.

IMG_9957
JRF उपक्रमातील सहभागी विद्यार्थी एकत्रीत चर्चा करताना

 एकूण नऊ महिने कालावधीचा हा उपक्रम असून हा कालावधी उत्तमपणे पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना जे आर एफ फेलो(JRF Fellow) म्हटले जाते. या वर्षीचा उपक्रम सुरु होऊन तीन महिने झाले आहेत. अजून पुढे तीन महिने हे विद्यार्थी अनेक गोष्टी शिकणार आहेत, अनुभवणार आहेत. त्यांच्यामधील हा छोटासा बदल मात्र खूप आश्वासक आहे. परिस्थितीला दोष न देता आवश्यक जीवन कौशल्य आत्मसात करून परिस्थिती बदलण्यावर विश्वास असलेल्या या मुलांना खूप खुप शुभेच्छा.

 

The writer Ganesh Dalvi, works as a Communication Officer with Lend A Hnad India. He likes to travel and collect the unnoticed stories from the field.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

%d bloggers like this: