‘गणित सारथी’ फेलोशिप प्रदान समारंभ

IMG_0410

शुक्रवार, दिनांक २ सप्टेंबर रोजी कन्याशाळा सातारा येथे लेंड अ हँड इंडिया संस्थेच्या वतीने गणित शिक्षकांकरिता विशेष फेलोशिप प्रदान समारंभाचे आयोजन केले होते. गणित विषय अध्ययन अध्यापनाच्या नाविन्यपूर्ण व कल्पक पद्धतींचा प्रचार व प्रसार करण्यास प्रोत्साहन देणारी ‘गणित सारथी’ फेलोशिप सातारा जिल्ह्यातील ९ गणित शिक्षकांना प्रदान करण्यात आली आहे.

 

विद्यार्थ्यांना गणित विषयाबद्दल वाटणारी भीती ही अनेकदा त्या विषयाच्या अध्ययन अध्यापन पद्धतीमध्ये लपलेली असते. शिक्षकांचे गणित अध्यापन आनंदी व्हावे तसेच विद्यार्थ्यांना गणित विषय शिकताना दडपण येऊ नये या उद्देशाने लेंड अ हँड इंडिया (लाही) संस्थेने सातारा जिल्ह्यातील ११ तालुक्यांतून ५५ शिक्षकांसाठी ‘सहज सोप्पे गणित अध्यापन’ प्रकल्प हाती घेतला. गणित विषय आनंददायी, अर्थपूर्ण आणि विद्यार्थ्यांच्या समजून घेण्याच्या पद्धतीला अनुकूल व्हावा हा या प्रकल्पाचा उद्देश होता. यामध्ये महिन्याच्या अंतराने सलग चार कार्यशाळा ५५ गणित शिक्षकांसाठी घेण्यात आल्या. चार कार्यशाळा पूर्ण केल्यावर सहभागी शिक्षकांना गणित विषयाच्या अध्यापनाचा जिल्ह्यातील सर्वच शिक्षकांना व विद्यार्थ्यांना उपयोग व्हावा या उद्देशाने ५५ शिक्षकांमधून ९ शिक्षकांची ऐच्छिक तत्वावर निवड करण्यात आली. या एक वर्षात प्रत्येक गणित सारथी शाळेमध्ये गणित उपक्रम करेल व निवडक पाच शिक्षकांना साधे सोप्पे गणित अध्यापन या विषयावर प्रशिक्षण देईल व शाळेतील गणितात चांगली कामगिरी करणाऱ्या तसेच ज्यांची गणितातील गती कमी आहे अशा पाच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करेल.

IMG_0336

स्वागत गीताने पाहुण्यांचे स्वागत झाल्यावर संस्थेच्या कार्यकारी संचालिका सौ. सुनंदा माने यांनी सर्वप्रथम लेंड अ हँड  इंडिया या संस्थेचे कार्य व गणित सारथी फेलोशिप देण्यामागचा उद्देश स्पष्ट केला. त्यानंतर ‘एका कल्पनेची शक्ती’ या विषयावर त्यांनी उपस्थित शिक्षकांचे मार्गदर्शन केले. तसेच नियोजन आणि एक दृढनिश्चय आणि त्यासाठी झोकून देण्याची तयारी असेल तर आपण साम्राज्य उभे करू शकतो असे सांगून त्यांनी सुरुवात केली. १३ वर्षांपूर्वी लेंड अ हँड इंडियाचा प्रवास अशाच एका संकल्पनेने झाला; गुणात्मक माध्यामिक शिक्षण. कोणताही प्रकल्प उभा करायचा असेल तर किती खोलात जाऊन विचार करावा लागतो हे त्यांनी उदाहरण देऊन स्पष्ट केले. पहिली सात वर्षे कष्ट केल्यानंतर हळूहळू लेंड अ हँड इंडिया संस्था नावारूपाला येऊ लागली आणि आज देशाच्या ८ राज्यांमध्ये त्याचे अस्तित्व दिसून येते.

भारतीय प्राचीन विद्येचे अभ्यासक आणि मुलांचा कलागुण व सर्वांगीण विकास या विषयांवर कार्यरत असलेले श्री. भालचंद्र पुरंदरे हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. ‘चाणक्य – एका शिक्षकाचे चरित्र’ या विषयावर ते बोलत होते. ‘आजच्या जगात शिक्षणाचा उद्देश कुठेतरी हरवला आहे. झपाट्याने वाढणारे तंत्रज्ञान आणि ढासळणारे तत्त्वज्ञान या दोन्हींची सांगड घातल्यास माणसाला दिशा आणि सुख मिळू शकते. अशा या जगात शिक्षIMG_0348क त्याचे सामर्थ्य हरवून हतबल होतो. ‘मी एकटा काय करू शकेन? जग बदलण्याचे सामर्थ्य माझ्यात आहे का? असे प्रश्न त्याला भेडसावत राहतात. या प्रश्नांची उत्तरे पाहण्यासाठी इतिहास चाळला तर डोळ्यांपुढे येणारे पहिले नाव म्हणजे विष्णुगुप्त अर्थात ‘चाणक्य’. इतिहासातील सर्वात रक्तरंजित काळात भारताला सावरणारा एक शिक्षक होता. केवळ ज्ञान आणि निष्ठेच्या जोरावर आपल्याला एक नव्हे तर तीन श्रेष्ठ सम्राट; सम्राट अशोक, चंद्रगुप्त मौर्य आणि बिंदुसार; बहाल करणारा एक शिक्षक होता.’ ‘शिक्षक सामान्य नसतो. निर्माण आणि प्रयोग हे त्याच्या मांडीवर खेळतात’. या शब्दात पुरंदरे सरांनी उपस्थित शिक्षकांना स्वतःचे सामर्थ्य आणि महत्व पटवून दिले. १९९१ साली प्रसारित मालिका ‘चाणक्य’ मधील ठराविक चित्रफिती सादर करून त्यांनी त्यांच्या व्याख्यानाला दुजोरा दिला. उपस्थित शिक्षकांनी त्यांच्या व्याख्यानाचे टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले.

यानंतर सातारा शिक्षण विभाग मार्फत उपस्थित असलेल्या श्री. महामुनी, उप-शिक्षणाधिकारी, सातारा यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. ‘शिक्षकाला विद्यार्थ्याप्रती आपुलकी असेल तरच आपले सेवाव्रत पूर्ण होऊ शकते.’ लाहीच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे कौतक करत असताना ते म्हणाले, “लेंड अ हँड इंडिया संस्थेने त्यांच्या नावाप्रमाणेच आपल्याला मदतीचा हात देऊ केला आहे. त्यांनी हे ज्ञान आपल्याला उधारीवर दिले आहे. त्यांची परतफेड करायची असले तर आपल्यापाशी संकलित झालेले हे ज्ञान शक्य तितक्या लोकांपर्यंत पोचवणे ही आपली जबाबदारी आहे.” त्यांच्या सहज सोप्या भाषेतून महामुनी यांनी शिक्षकांना फेलोशिपचे महत्व अगदी थोडक्यात पटवून दिले.

 

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s