प्रयोगशील कृतीवर काम करणारे Quality Education Support Trust (QUEST)

लेंड-अ-हँड इंडिया द्वारे सुरु करण्यात आलेल्या शिक्षण मंथन कार्यक्रमाची सहावी बैठक दिनांक २६ नोव्हेंबर २०१५

100_1735.JPG
Mr Nimkar of QUEST

रोजी आयोजित करण्यात आली होती. याकरिता प्रमुख वक्ते म्हणून Quality Education Support Trust (QUEST) या संस्थेचे संचालक ‘श्री. निलेश निमकर’ यांना आमंत्रित करण्यात आले होते.

बैठकीचा थोडक्यात वृत्तांत खालीलप्रमाणे –

 

गेली १५ वर्षाहून अधिक काळ श्री. निमकर सर शिक्षण क्षेत्रात काम करीत आहेत. सर आणि त्यांचे मित्र – मैत्रिणींनी एकत्र येऊन नेहमी शिक्षण व त्याची गुणवत्ता या विषयावर चर्चा करत असत.  मुलांना शिक्षण तर मिळतय पण ते ज्या गुणवत्तेच हवय त्या गुणवत्तेच मिळत नाहीये हे लक्षात आल्यावर ही गुणवत्ता कशी वाढवता येईल ह्याचा विचार सुरु झाला. जवळजवळ ५ वर्षांच्या सततच्या चर्चे नंतर  २००७ साली Quality Education Support Trust (QUEST) या संस्थेचा उगम झाला. समाजातील मुख्य प्रवाहापासून वंचित असलेल्या घटकासाठी काम करण्याचे ठरवल्यावर ठाण्यातील आदिवासी भाग हे कार्यक्षेत्र ठरल.

शिक्षण क्षेत्रामध्ये उत्तमोत्तम बदल घडून यावे त्यास उत्तम दर्जा प्राप्त व्हावा व त्याचा परिणाम चांगला घडावा यासाठी प्रयोगशील कृतीवर अनेक शाळा काम करत होत्या पण छोट्या प्रमाणात.

100_1743.JPG
The Q & A in progress

त्यांचे कार्यक्षेत्र वाढवायची गरज संस्थेच्या लक्षात आली आणि ही दरी मिटवायचे काम संस्थेने ५ शाळांमध्ये सुरु करून दूर करायचे ठरवले.
अशा प्रकारे संस्था सुरु करण्यामागचा इतिहास सांगून सरांनी संस्थेच्या विविध प्रकल्पांची माहिती दिली. जसे की,
१) शिक्षक मित्र – शिक्षकांच्या निरंतर विकासासाठी
२) अंकुर – अंगणवाडीसाठी बालशिक्षण कार्यक्रम
३) पुस्तकगाडी – मुलांसाठी फिरते ग्रंथालय
४) सक्षम – वाचन उपक्रम
५) बालभवन – प्राथमिक शिक्षणासाठी पूरक कार्यक्रम
त्याचबरोबर ग्रामीण बालभवन प्रकल्प, आश्रम शाळा आणि जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये राबविला जातो.

 

संस्थेच्या विविध प्रकल्पांच्या माहितीबरोबरच सरांनी सांगितले की, शैक्षणिक स्तर उंचावण्याची गरज ही सगळ्याच प्रकारच्या शाळांना आहे. पण कुठल्याही चांगल्या गोष्टीचा स्तर उंचावणे आणि तेही मोठ्या प्रमाणात खूप अवघड आहे.

IMG_20151126_183128400_HDR.jpg
Gauri of LAHI facilitates session

 

शिक्षण क्षेत्रात काम करण्यासाठीचे अनेक पैलू आहेत. परंतु तेवढी कौशल्य असणाऱ्या व्यक्तींची मात्र कमतरता आहे अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली. तसेच विविध भाषांवर विद्यापीठामध्ये संशोधन होत नसल्याची आणखी एक खंत बोलून दाखवत ते संशोधन होण्याची गरज देखील त्यांनी बोलून दाखवली. त्याकरता देखील Quality Education Support Trust (QUEST) छोट्या प्रमाणावर काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.

 

सरांच्या शिक्षण क्षेत्रातील कामाचा अनुभव लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रमाकरता त्यांची प्रशिक्षक सल्लागार म्हणून काम केले आहे. तसेच UNICEF व Sir Ratan Tata Trust ह्या दोन्ही संस्थांचे ते सल्लागार म्हणून काम करत आहेत.

100_1746.JPG
Sunanda, Executive Director of LAHI, presents a token of gratitude

 

सरांच्या या कार्यामध्ये त्यांच्या पत्नी सौ. मीना निमकर ह्यादेखील तेवढ्याच मोलाचे सहकार्य त्यांना करत आहेत..

कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेच्या कार्यकारी संचालिका श्रीमती सुनंदा माने ह्यांच्या हस्ते संस्थेच्या पुस्तकगाडी प्रकल्पास खारीचा वाटा म्हणून काही पुस्तके भेट म्हणून देण्यात आली व त्यांचे आभार मानण्यात आले.

संस्थेच्या कामाच्या अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेल्या पत्त्यावर संपर्क साधा व वेबसाईट लिंकवर जा –
श्री. निलेश निमकर
संचालक
Quality Education Support Trust (QUEST)
२३३, सोनाळे बुद्रुक, तालुका वाडा,
जिल्हा पालघर – ४२१३०३
९८५०८१७२०८ (द्वारा श्रीमती अर्चना कुलकर्णी)
nilesh.nimkar@quest.org.in
www.quest.org.in

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s