संतुलन संस्थेची पाषाणशाळा

लेंड-अ-हँड इंडिया द्वारे सुरु करण्यात आलेल्या शिक्षण मंथन कार्यक्रमाची पाचवी बैठक दिनांक २९ ऑक्टोबर २०१५ रोजी आयोजित करण्यात आली होती. प्रमुख पाहुणे म्हणून संतुलन संस्थेचे संस्थापक मा. श्री. बस्तू रेगे यांना आमंत्रित करण्यात आले होते.

Shikshan Manthan_29-10-2015
Mr Rege talks about Santulan

श्री. बस्तू रेगे यांचे प्राथमिक शिक्षण महाराष्ट्रात, महाविद्यालयीन शिक्षण गोव्यात तर पदव्युत्तर शिक्षण कर्नाटक येथे झाले. पदव्युत्तर शिक्षणानंतर पुण्यात येऊन त्यांनी कायद्याचे शिक्षण घेतले. पुण्यामध्ये येण्याची प्रेरणा त्यांना आण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलन व मेघा पाटकर यांच्या नर्मदा बचाव आंदोलनामुळे मिळाली असे ते सांगतात.

रेगे सरांच्या स्वतंत्र व वैयक्तिक कामाची सुरुवात १९९७ मध्ये सुरु झाली. त्यामागची प्रेरणा मात्र अत्यंत अत्यंत वेदनादायी व पण तितकीच संवेदनशील आहे. संध्याकाळच्या वेळी कामावरून घरी परत जात असताना आगाखान पॅलेस जवळ त्यांच्या समोर एक अपघात झाला. १३ वर्षांच्या एका मुलाला डंपरने उडवले होते. अपघातस्थळीच एक आयुष्य संपलं होतं. त्या मुलाच्या विधवा आईने फोडलेला हंबरडा सरांना अस्वस्थ करून गेला. त्या आईला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी त्या डंपरचा पाठलाग केला व ते पोहोचले वाघोली परिसरातील खाणी आणि क्रशरच्या परिसरात. भटक्या विमुक्त समाजातील दलित आदिवासी समाजातील आणि अल्पसंख्य मुस्लिम समाजातील स्त्री-पुरुष डोंगर फोडून दगड काढताना डोंगरासारखी हिंमत दाखवत होती. पण सोबतच माणूस म्हणून जगण्यासाठी लागणाऱ्या कमीत कमी सुविधांच्या अभावाला तोंड देत जीवन कंठीत होती. त्यांची हलाखीची परिस्थिती रेगे सरांनी बघितली ती एका विधवा मातेला न्याय देण्याच्या निमित्ताने. पण त्या डंपरच्या शोधात त्यांना दिसले असे शेकडो डंपर आणि न्यायाची वाट पाहत असणारे हजारो दगडखाण कामगार. रेगे सरांना त्यांच्या पुढील कार्याची वाट सापडली. ह्या लोकांचं जीवनमान उंचावण्यासाठी गरज होती त्यांच्या मुलांना शिक्षण देण्याची. आणि ह्या विचारातूनच दगडखाण कामगारांच्या मुलांसाठी सुरु झाली संतुलन पाषाणशाळा.

Shikshan Manthan_29-10-2015
Audience engage in a discussion with Mr. Rege

एका पाषाणशाळेपासून सुरु झालेला हा प्रवास खूप विस्तारलेला आहे. एकूण ४४ पाषाणशाळा आणि ३५,००० हून अधिक मुले एवढा विस्तार झालेला आहे. मुल ज्या वयाच्या ज्या इयत्तेत असण अपेक्षित आहे त्या इयत्तेत त्याला बसवलं जात आणि मागच्या इयत्तांचा अभ्यास पण त्याच्याकडून करवून घेऊन त्या इयत्ता पूर्ण करवून घेतल्या जातात. त्यांना अनौपचारिक परंतु पाठ्यक्रमानुसार शिक्षण दिले जाते. कामगारांच्या सतत स्थलांतरीत होण्याचे प्रमाण लक्षात घेऊन, मुलांच्या शिक्षणाचे नुकसान होऊ नये म्हणून निवासी पाषाणशाळा देखील सुरु केल्या आहेत. मुलांना जेवण, कपडे, राहण्याची सोय इ. सर्व मोफत देण्यात येते. आणि हे सगळ चालत कुठल्याही सरकारी अनुदानाशिवाय आणि फक्त देणगीदारांकडून मिळणाऱ्या देणग्यांच्या आधारे.

सरकारच्या नव्या शिक्षण हक्क कायद्यानुसार सगळ्या पाषाणशाळा ह्या बेकायदेशीर ठरवून बंद करायला सांगितल्या आहेत. ह्यावर त्यांचं एका श्रोत्याने मत विचारले असता ते म्हणाले की, पाषाणशाळा बंद करायला नकार नाही पण मग पाषाणशाळा बंद केल्यावर मुलांच्या शिक्षणाची सोय काय?

Shikshan Manthan_29-10-2015
Shikshan Manthan_29-10-2015

सरकार खाणींमध्ये शाळा सुरु करणार नाही. कारण ते म्हणते मुलांनी शाळेपर्यंत यावं.. संस्थेचं म्हणणं आहे की शाळेने मुलांपर्यंत का येऊ नये.. खाण तिथे शाळा का सुरु करू नये. संस्थेचा आता ह्या मुद्द्यावर लढा सुरु आहे. शाळेतील शिक्षकांविषयी एका श्रोत्यांनी विचारले असता ते म्हणाले की, शाळेत पूर्वी कार्यकर्ते शिकवायचे. आता जे शिक्षक आहेत ते डी.एड. अथवा बी.एड. झालेले आहेत. संस्थेच्या कार्यक्षेत्राविषयी विचारले असता त्यांनी सांगितले की, महाराष्ट्र, राजस्थान व मध्य प्रदेश येथे संस्थेचे कार्य सुरु आहे.

सरांच्या या कार्यामध्ये त्यांच्या पत्नी सौ. पल्लवी रेगे ह्यादेखील तेवढ्याच मोलाचे सहकार्य त्यांना करत आहेत. रेगे दांपत्यांच्या ह्या कार्याची दखल घेत त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.

कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेच्या कार्यकारी संचालिका श्रीमती सुनंदा माने ह्यांच्या हस्ते संस्थेच्या  मुलांना भेटवस्तू देण्यात येऊन त्यांचे आभार मानण्यात आले.

संस्थेच्या कामाच्या अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेल्या पत्त्यावर संपर्क साधा व वेबसाईट लिंकवर जा.

श्री. बस्तू रेगे

संतुलन,
संतुलन भवन,
स. नं. ५५/२, तुळजाभवानी नगर,
नगर रोड, खराडी,
पुणे – ४११०१४

संपर्क क्र. – +९१ ९३७१२०६७५०/५१/५६
E-mail – info@santulan.org
Website – www.santulan.org

Advertisements

Published by Lend A Hand India

Lend-A-Hand India is a not for profit venture launched in 2003 in New York. Currently working out of Pune, it focuses on issues related to youth. Its programs provide vocational training and career counselling to secondary school students in rural and urban communities. In addition, scholarships for pursuing higher studies, and bridge loans for those with an entrepreneurial spirit are also offered to deserving graduates from our participant schools. LAHI also collaborates with dynamic grassroot non-profit organizations to develop and implement innovative projects.

Leave a comment

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: