पुनरुत्थान समरसता गुरुकुलम” : गुरुकुलम पद्धतीवर आधारित शिक्षण – डॉ. गिरीश प्रभुणे

लेंड-अ-हँड इंडिया द्वारे सुरु करण्यात आलेल्या शिक्षण मंथन कार्यक्रमाची चौथी बैठक दिनांक २४ सप्टेंबर २०१५ रोजी आयोजित करण्यात आली होती. प्रमुख पाहुणे म्हणून मा. डॉ. श्री. गिरीश प्रभुणे यांना आमंत्रित करण्यात आले होते.

डॉ. गिरीश प्रभुणे
डॉ. गिरीश प्रभुणे

लहानपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य करणारे व कार्यकर्ते असणारे श्री. प्रभुणे सर संघाचाच एक भाग असलेल्या ग्रामायण या संस्थेमध्ये १५ वर्ष कार्यरत होते. ह्या कार्यादरम्यानच त्यांचा फासे-पारधी, कोल्हाटी, डोंबारी, लमाण, नंदीवाले, मरीआईवाले, गोंधळी, वासुदेव इ. समाजाच्या लोकांशी संपर्क आला. परंपरागत अंगभूत कला अवगत असलेले हे लोक शिक्षणापासून मात्र वंचित आहेत असे लक्षात आल्यावर त्यांच्या या कलागुणांसोबतच शिक्षण देखील द्यायची गरज लक्षात आली. त्यांच्यासाठी विविध प्रकारचे शैक्षणिक प्रकल्प राबवले गेले. काही वर्षांनी जेव्हा ह्या प्रकल्पांचा आढावा घेतला गेला तेव्हा लक्षात आलं की मुलांना शिक्षण देऊनही मुलं बेरोजगार आहेत. शिक्षणामुळे त्यांच्यातले नैसर्गिक ज्ञान जसे की, औषधी वनस्पतीची नाव व उपयोग इ. ज्ञान मात्र ते विसरलेत. Continue reading पुनरुत्थान समरसता गुरुकुलम” : गुरुकुलम पद्धतीवर आधारित शिक्षण – डॉ. गिरीश प्रभुणे