“रचनावाद” आधारित प्राथमिक शिक्षणाचे प्रयोग – प्रतिभा भराडे

शिक्षण मंथन”ची तिसरी बैठक गुरुवार, दिनांक २७ ऑगस्ट २०१५ रोजी आयोजित करण्यात आली होती.

ऑगस्ट महिन्याचे “शिक्षण मंथन”, श्रीमती. प्रतिभा भराडे यांच्याद्वारे झाले.

Guest Speaker Pratibha Bharade alongwith Sandeep of LAHI
Guest Speaker Pratibha Bharade alongwith Sandeep of LAHI

शिक्षण क्षेत्रात विविध प्रकारे कार्यरत असणार्‍या अनेक शाळा, संस्थांचे प्रतिनिधी सदर बैठकीला उपस्थित होते. महत्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा, प्रश्नोत्तरे, अनुभवांचे आदान-प्रदान झाले. बैठकीत झालेल्या एकूण चर्चेचा गोषवारा थोडक्यात पुढे देत आहे :-

प्रतिभा भराडे सातारा जिल्ह्यातल्या कुमठे विभागाच्या (-सज्जनगडाच्या पायथ्याचा परिसर) शिक्षण विस्तार अधिकारी आहेत. आधी सहा वर्षे शिक्षक म्हणून काम केल्यावर भराडे यांनी प्रशासकीय कार्यभार स्विकारला होता.

सगळी मुलं शाळेत आली पाहिजेत, ती शाळेत टिकली पाहिजेत, त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळालं पाहिजे यासाठी शिक्षण विस्तार अधिकारी प्रतिभा भराडे झपाटल्यागत काम करत आहेत. सरकारी चौकटीत राहून चौकटीबाहेरचं काम कसं करता येईल, हे दाखवताना बीटमधल्या ४० पैकी ४० शाळांमधल्या मुलांच्या मनात त्यांनी घर केलंय.

शैला दाभोळकर यांच्या सहाय्याने त्यांनी त्यांनी तब्बल ३६ शाळांमध्ये सेंद्रिय परसबागेची संकल्पना राबवून कुपोषणावर मात केली.

https://www.youtube.com/watch?v=LEE-XhWSlAk

राज्याच्या ग्रामीण भागात शिक्षण पुढे नेण्यासाठी झटणार्‍या बोटांवर मोजण्या इतक्याच स्त्रिया आहेत.  प्रतिभा भराडे त्या स्त्रियांच्या साखळीतली एक महत्त्वाची कडी आहेत, एखाद्या अधिकार्‍याने पुढाकार घेऊन काम केलं तर काय घडू शकतं, याचा त्या आदर्श वस्तुपाठ आहेत.

त्या लेखिकाही आहेत. ‘मुलं स्वत: शिकत आहेत…’ हा लेख पालकनीती अंकात प्रसिद्ध झाला होता. शिवाय साधना प्रकाशन तर्फे “कवाडे उघडताच” हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. या पुस्तकात खटाव तसेच सातारा तालुक्यातील शाळांमध्ये जे छोटे छोटे उपक्रम राबविले होते त्यांविषयी वाचायला मिळते. हे पुस्तक म्हणजे एक अनुभवमालिका आहे.

प्रतिभा भराडे यांनी सुरुवातीला जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षिका म्हणून सुरुवात केली. शिक्षण व शिकविणे यांची गोडी असली तरी त्या शिक्षकी पेशात फार रमल्या नाहीत. पुढे सहा वर्षांनी स्पर्धा परीक्षांच्या द्वारे त्या प्रशासनात आल्या. गट शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून त्यांनी खटाव तालुक्यात काम सुरु केले.

भराडे यांचे बालपण मध्यमवर्गीय कुटुंबात गेले होते, गरीबी त्यांना फारशी माहिती नव्हती.  त्यांचे एक ज्येष्ठ सहकारी नामदेव माळी (‘शाळाभेट’ या पुस्तकाचे लेखक) यांच्यामुळे त्यांना सर्वसमावेशक दृष्टी लाभली.

पुढे एक वर्षासाठी त्या मुंबई येथे विशेष प्रशिक्षणाला गेल्या. तो काळ त्यांच्यासाठी टर्निंग पॉइंट होता. तेथे त्यांना माणूस समजायला मदत झाली. तेथून परतल्यावर त्यांच्यातील बदल त्यांच्या सहकार्‍यांना जाणवले. कडक शिस्तीच्या अधिकार्‍याचे मृदू अधिकार्‍यात बदल झाला होता. सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची आता सहजता होती. सहकार्‍यांच्या कुटुंबियांसमवेत सातत्याने संपर्क वाढविला. खटाव तालुक्यात परतल्यावर त्यांनी अनेक वेगळे प्रयोग केले.

पुढे त्यांची सातारा तालुक्यात बदली झाली.

Attendees listen intently
Attendees listen intently

२००४ साली त्यांनी एकही मुल नापास करायचे नाही हा धाडसी निर्णय त्यांनी घेतला. त्यामागे, मुलगी जर नापास झाली तर तिचे लहान वयात लग्न लावून दिले जाते अन् मुलगा नापास झाला तर त्याला शाळा सोडायला लावून शेतावर कामास लावले जाते; हे चित्र बदलण्यासाठी त्यांचा हा निर्णय होता. शाळेत असलेल्या मुला-मुलींना प्रगत कारायचेच यासाठी विविधप्रकारे त्यांनी प्रयत्न केले. किशोरी मेळावे घेतले. वयात येणार्‍या मुलांसाठी ‘वयात येताना’ हा प्रबोधनपर संवाद आयोजिला.

NCERT (National Council Of Educational Research And Training) द्वारा ‘रचनावाद’ (कन्स्ट्रक्टिविझम) संकल्पनेद्वारे शिक्षण याची मांडणी २००५ मध्ये करण्यात आली.

मराठी विषयाच्या पुनर्रचना समितीवर काम करीत असताना त्यांना रचनावाद म्हणजे नेमके काय याची फारशी माहिती नव्हती.

वाई येथील अरुण किर्लोस्कर यांचे भारत विद्यालय येथे रचनावाद अवलंबिला जातो हे त्यांना समजले, त्यामुळे त्या शाळेला त्यांनी भेट दिली. पण धावत्या भेटी देऊन अर्थातच काही समजले नाही. किर्लोस्करांनी त्यांना रचनावाद समजायचा असेल तर दहा दिवस येऊन रहा असे सांगितले. त्यानुसार मग प्रतिभा भराडे यांनी सुट्टी काढली आणि तिथे राहायला गेल्या.

पहिलीच्या वर्गात चक्क एका कोपर्‍यात बाजूला खाली बसून काय चालते त्याचे निरीक्षण केले. अवघ्या चार दिवसांत त्यांना रचनावादाचे मर्म समजले आणि त्या तिथून निघाल्या आणि ही आगळी पद्धत जिल्हा परिषदेच्या शाळांत वापरावयाचे मनात पक्के केले. त्यानंतर त्यांनी इतर अशा प्रकारच्या  कोणत्याही इतर शाळेला भेट दिली नाही की कोणतेही प्रशिक्षण घेतले नाही. रमेश पानसे यांचे ‘रचनावादी शिक्षण’ हे पुस्तक चार वेळा वाचले, पण समजले नाही. मात्र पुढे प्रत्यक्ष काम करताना त्यांचे त्यांनाच रचनावादाचे अनेक पदर उलगडत गेले!

त्यांनी स्वतःच सहकारी शिक्षक आणि अधिकारी वर्ग यांच्या सहाय्याने तब्बल ६० खेळ विकसित केले. आणि खर्‍या अर्थाने वर्तनवाद झुगारून रचनावाद स्विकारण्याची प्रक्रिया सुरु केली. आत्मविश्वास, आनंद, निर्णयक्षमता या गुणांचे विकसन कसे होईल यावर लक्ष केंद्रित केले.

२०११ पासून प्रतिभा भराडे यांनी याच संकल्पनेवर आधारित अभ्यासक्रम जिल्हा परिषदेच्या शाळांमधून राबविण्यास सुरुवात केली. ट्रस्ट संचालित, खाजगी शाळांमध्ये काही तुरळक प्रयोग होत होते, मात्र महाराष्ट्रात सरकारी शाळांमध्ये (जिल्हा परिषदेच्या शाळा) रचनावादाचा हा पहिलाच प्रयोग होता.

पण मुळात आत्ताची ‘रचनावाद (कन्स्ट्रक्टिविझम)’ आणि आधीची ‘वर्तनवाद (बिहेवियरिझम)’ शिक्षण पद्धती म्हणजे नेमके काय?, हे थोडक्यात समजाऊन घेऊया…

१९व्या शतकाच्या सुरुवातीला ब्रिटीशकाळात मेकॉलेने भारतातल्या शिक्षणाला औपचारिक चौकट दिली. त्याआधी परंपरेने चालत आलेले शिक्षण इथे सुरु होते. शिक्षणाचा प्रसार-प्रचार झाला. महत्त्व पटल्याने प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च शिक्षणाचा टप्प्याटप्प्याने विस्तार होत गेला. या काळात शिक्षणात निरनिराळे प्रयोग झाले. काळ बदलतो तसे शिक्षण बदलते. सध्या बदलांनी प्रचंड वेग घेतलाय. बालशिक्षणाची दिशा स्पष्ट करणारा २००५चा राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा, २००९साली आलेला शिक्षण हक्काचा कायदा, त्यातल्या निरनिराळ्या तरतुदी, त्यानुसार होणारे निर्णय… वर्तनवादी शिक्षण पद्धतीकडून रचनावादाच्या दिशेने सुरु झालेला प्रवास… एकूणच शिक्षणक्षेत्राच्या दृष्टीने सध्याचा काळ संक्रमणाचा काळ आहे.

शिक्षण ही निरंतर बदलत जाणारी प्रक्रिया आहे. समाज बदलतो तसे शिक्षणही आपली कुस बदलत जाते. अलीकडच्या काळात जगभर जी काही संशोधने झाली. त्यातून शिक्षणात नवे प्रवाह आले. शिक्षणात आधीचा वर्तनवादी विचार मागे पडतो आहे. नव्या संदर्भासह नवी ज्ञानसंरचनावादी विचारसरणी उदयाला आली आहे. जीन पियाजे(जर्मनी) आणि वायगोटस्की या दुकलीने याविषयी प्रचंड मोठे काम केले आहे. मुलभूत संशोधन आणि प्रयोगांनंतर जगभरातल्या ठिकठिकाणच्या समुदायांनी या विचारसरणीचे स्वागत केले आहे. १९२५च्या सुमारास या ज्ञानरचनावादी विचारसरणीचा उदय झाला. १९५०च्या आसपास युरोप आणि पुढे १९७०च्या दरम्यान अमेरिकेसह जगभरातल्या इतर देशांत या तत्त्वानुसार बालशिक्षण सुरु झाले. १९६० च्या दशकात जिवंत माणसाचा मेंदूचा अभ्यास करणे वैद्यकीय क्षेत्रात शक्य झाले. त्याच्या निष्कर्षांची आणि शालेय अभ्यासक्रमाची सांगड घालण्यात आली.

गेल्या काही वर्षांपासून आपणही ज्ञानसंरचनावादी विचारसरणीकडे वळलो आहोत. सरकारी पातळीवर स्वीकार होण्याआधी काही प्रयोगशील शाळांतून या तत्त्वानुसार काम सुरु होते. २००५ साली नवी दिल्ली येथील आपल्या देशातल्या राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (NCERT) तज्ज्ञांच्या मदतीने राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा तयार केला. देशातल्या शिक्षणाची एकूणच दिशा स्पष्ट करणारा, शिक्षण कशासाठी, कसे असावे यामागील भूमिका सांगणारा तो अधिकृत सरकारी दस्ताऐवज आहे. रचनावादी विचारसरणी हा या सगळ्याचा गाभा आहे.

National Curriculum Framework 2005 by NCERT =

http://www.ncert.nic.in/rightside/links/nc_framework.html

Guests and LAHI's founders interact with the speaker
Guests and LAHI’s founders interact with the speaker

प्रतिभा भराडे यांच्या उपक्रमास परदेशातील शिक्षण तज्ज्ञांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे.

रचनावादाचे सकारात्मक परिणाम अवघ्या काही महिन्यात दृश्यरूप होतात. आधीच्या शिक्षण पद्धतीतीमधील शिक्षकांना भिणे, आत्मविश्वास नसणे, धडधड वाटणे आदी बाबी नाहीश्या होतात. विद्यार्थ्यांच्या मनातील गुलामगिरी नाहीशी होते. सहभागी आकलन वाढते. मूलं प्रगत होतात.

सचिव दर्जाचे अधिकारी श्री. नंदकुमार काही कामानिमित्त त्यांची शाळा बघायला आले होते आणि ते तेथील प्रगती पाहून भारावून गेले. योगायोगाने काहीच दिवसांत त्यांची शिक्षण सचिव म्हणून बदली झाली. साहजिकच त्यांनी प्रतिभा भराडे यांनी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये केलेले रचनावादाचे प्रयोग सर्वदूर पोहोचवायचे ठरविले. त्यासाठी त्यांनी शिक्षण खात्यातील विविध स्तरावरील अधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक यांना त्यांच्या शाळा भेट करण्याबाबत शासन निर्णय घेतला.

सध्या महिन्यातील तब्बल ४०० व्यक्ती प्रत्येकी दोन शुक्रवारी कुमठे विभागातील शाळा पहायला येतात.

एकूण उपक्रमाच्या यशाचे श्रेय त्या त्यांच्या सर्व सहकार्‍यांना देतात. WhatsApp Group द्वारे त्या १३० शिक्षकांशी सातत्याने संपर्कात असतात.

आता त्यांच्याकडे नव्याने निर्माण झालेल्या पालघर जिल्ह्यात रचनावाद राबविण्याची जबाबदारी ग्राममंगल संस्थेच्या सोबत देण्यात आली आहे.

प्रतिभा भराडे यांच्यापासून प्रेरणा घेऊन आता नाशिक, चंद्रपूर, मिरज येथेही रचनावाद द्वारे प्राथमिक शिक्षण देण्याचे प्रयोग परिणामकारकरित्या केले जात आहेत.

प्रतिभा भराडे यांच्याशी संदीप महाजन याने मुलाखतीच्या स्वरूपात संवाद साधला.

प्रतिभा भराडे यांची संपर्क माहिती :-

eMail:                   bharade321@rediffmail.com

कार्यक्रमाच्या शेवटी लेंड अ हँड इंडिया संस्थेचे सह-संस्थापक श्री. राज गिल्डा यांच्या हस्ते प्रतिभा भराडे यांना पुस्तकांचा संच भेट देऊन आभार मानण्यात आले.

Advertisements

Published by Lend A Hand India

Lend-A-Hand India is a not for profit venture launched in 2003 in New York. Currently working out of Pune, it focuses on issues related to youth. Its programs provide vocational training and career counselling to secondary school students in rural and urban communities. In addition, scholarships for pursuing higher studies, and bridge loans for those with an entrepreneurial spirit are also offered to deserving graduates from our participant schools. LAHI also collaborates with dynamic grassroot non-profit organizations to develop and implement innovative projects.

Leave a comment

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: