३६५ दिवसांची शाळा

Guest Speaker sharing his experiences with the participants
Mr Dattatraya Sakat shares his innovations with the audience

शिक्षण मंथन”ची दुसरी बैठक गुरुवार, दिनांक २३ जुलै २०१५ रोजी आयोजित करण्यात आली होती.

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील कर्डेलवाडी येथील जिल्हापरिषदेची शाळा ३६५ दिवस चालू असते!!!!! आणि हो ही निवासी अथवा आश्रम शाळा नाही. तरीदेखील तेथील विद्यार्थी-विद्यार्थिनी वर्षभर शाळेत येतात. सदर शाळा ISO प्रमाणित आहे!! मुख्याध्यापक श्री. दत्तात्रय रा. सकट आणि त्यांच्या शिक्षिका पत्नी श्रीमती बेबीनंदा सकट, हे समर्पित जोडपे ही शाळा चालवितात.

जुलै महिन्याचे “शिक्षण मंथन”, श्री. दत्तात्रय रा. सकट यांच्याद्वारे झाले.

शिक्षण क्षेत्रात विविध प्रकारे कार्यरत असणार्‍या अनेक संस्थांचे प्रतिनिधी सदर बैठकीला उपस्थित होते. महत्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा, प्रश्नोत्तरे, अनुभवांचे आदान-प्रदान झाले. बैठकीत झालेल्या एकूण चर्चेचा गोषवारा थोडक्यात पुढे देत आहे :-

शिक्षणाची कोणतीही पार्श्वभूमी नसलेल्या कुटुंबात दत्तात्रय रा. सकट यांचा जन्म झाला. आत्यंतिक गरिबीत बालपण गेले. पण महात्मा फुले, डॉ. आंबेडकर यांच्या प्रभावाने शिक्षण पूर्ण केले. पुढे शिक्षकी पेशा स्विकारला. पत्नीदेखील शिक्षिकाच.

२००१ साली दोघांची नियुक्ती कर्डेलवाडी येथील जिल्हापरिषदेच्या शाळेत झाली. इतर झेडपीच्या शाळांसारखीच याही शाळेची परिस्थिती बिकट होती. पण सकट पती-पत्नी यांनी झोकून देऊन काम करण्याचे ठरविले. नुसते शिक्षण नाही तर संस्कारीत शिक्षण द्यायला हवे याची खुणगाठ बांधली, विद्यार्थ्यांना ज्ञानार्थी बनवायचे, यासाठी वाट्टेल ते कष्ट उचलण्याची तयारी होती. सोमवार ते शनिवार पाठ्यपुस्तक शिकविण्याच्या कसरतीमध्ये हे सारे शक्य नव्हते. यातूनच रोज शाळा, सुट्टीला सुट्टी देणे ही संकल्पना आकारली.

सुरुवातीला खूप कमी उपस्थिती असे.. मात्र इतर दिवशी चालणार्‍या उपक्रमांनी विद्यार्थ्यांत जसा फरक दिसू लागला तस-तशी अनुपस्थित मुलेदेखील सुट्टीच्या दिवशी उपस्थित राहू लागली.

Participants listening with interest to a guest speaker
Questions are raised by the audience who would like to know more about his initiative

इथली बहुतेक मुले-मुली खूप गरिबीतून आलेली असतात. अनेकांना शैक्षणिक परंपरा नसते. दगड फोडणार्‍या, भटक्या कुटुंबातील अनेक मुले आहेत. काही शिकविण्याआधी ‘का शिकायचे?’ हे सांगण्यात, प्रबोधन करण्यात वेळ जातो. शिक्षणाबरोबरच त्यांच्या कलागुणांनाही वाव द्यावा लागतो. इंग्रजीविषयी भीती वाटू नये, असे वातावरण तयार केले जाते. (इथे आवर्जून सांगावेसे वाटते की मराठी माध्यमाच्या या झेडपी शाळेतील मुले-मुली चौथी पर्यंत इतके काही शिकतात की पाचवीला पुण्यातील ज्ञानप्रबोधीनीच्या CBSE शाळेत प्रवेश घेतात!)

प्रत्येक विद्यार्थ्यात व्यक्तिगत लक्ष दिले जाते. पहिली ते चौथी इयत्ता असलेल्या या शाळेत चार खोल्या आहेत. पण विद्यार्थ्यांना त्यांच्या आकलन क्षमतेनुसार गट पाडून बसविले जाते, त्यामुळे काही गट व्हरांड्यात बसतात तर काही अंगणात! आणि मग त्या-त्या गटाच्या गरजेनुसार शिकविले जाते!

मुलांच्या मनात शिक्षणाविषयी अनास्थे ऐवजी विश्वास आणि आकर्षण तयार केले जाते. अभ्यास हा त्रास वाटता कामा नये, या संकल्पनेतून शिकविले जाते.

शिक्षक प्रेरकाचे काम करतो. प्रत्येकात आत्मविश्वास भरण्याचा प्रयत्न केला जातो.

‘अजून थोडे चांगले कर.. अजून थोडे चांगले कर..’ असे म्हणत प्रत्येकाकडून अधिकाधिक उत्तम काढून घेतले जाते. चांगले शिकणार्‍यांसाठी विविध आमिषे असतात, उदा. पुण्यात E-Square ला आणून चित्रपट दाखविणे, आदी!

रविवार व अन्य सुट्ट्यांच्या दिवशी विद्यार्थ्यांचा अभ्यास घेण्याऐवजी त्यांच्या कलागुणांचा विकास कसा होईल याकडे लक्ष पुरविले जाते. सांस्कृतिक, व्यक्तिविकास, क्रीडा, शिष्यवृत्त्या, विविध स्पर्धा यांचाच विचार प्रामुख्याने केला जातो.

Participants asking questions during question-answer session
Participants asking questions during question-answer session

विद्यार्थ्यांना सर्वार्थाने सक्षम करण्याचा हा प्रयत्न आहे.

अर्थात, हा प्रयोग आहे आणि तो सर्वस्वी व्यक्तीसापेक्ष आहे. त्याचे सार्वत्रिकरण होईलच असे नाही. मात्र, पुणे जिल्ह्यात ३०० दिवस चालणार्‍या आणखीही काही शाळा आहेत. कर्डेलवाडीची शाळा बघून इतरांनाही प्रोत्साहन मिळतंय.

वेगळ्या वाटेवरून जाताना सर्वप्रथम व्यवस्थाच विरोध करते. आज ना उद्या आपल्याही १४५ सुट्ट्या रद्द होतील, अशी भीती असते. त्यामुळे सकट यांच्या वर्षभर शाळा या प्रयोगाला विरोधही होतो.

अर्थात, कोण किती दिवस शिकवतं हे जसे महत्वाचे आहे तसेच काय आणि कसे शिकविले जाते हेही तितकेच फार महत्वाचे आहे.

सकट दाम्पत्याने दोन्हींचा मेळ साधला आहे.

दत्तात्रय रा. सकट यांची संपर्क माहिती :-

eMail :        dattatryasakat@gmail.com

website :      http://www.zpeschoolkardelwadi.org

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

%d bloggers like this: